पूरग्रस्तांना मदतीचे धान्य लाटण्याचा प्रकार, महिला बचत गटाच्या महिलेनेच केला हात साफ
विरार : मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने करोना आणि सापसाच्या परिसराला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संस्था, सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती आपल्या परीने मदत करत आहेत. पण यातही काही संधिसाधू आपले हित साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. वसई विरार मधील महिला बचत गटांनी पूरग्रस्तांना जमवलेले सामान त्याच्या एका महिला गटाच्या एका सेविकेने लाटल्याच प्रकार समोर आला आहे. या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल झाला नसून या महिलेच्या घरातून इरार सदस्यांनी हे समान जप्त केले आहे.
वसई विरार मधील विविध महिला बचत गटांनी एकत्र येवून पूरग्रस्तांना मदत म्हणून मोठ्या प्रमाणात धान्य आणि इतर संसाराच्या गोष्ठी जमा केल्या होत्या. आणि या सर्व वस्तू चिपळूण येथे पाठवल्या जाणार होत्य. ह्या वस्तू पाठवण्यासाठी ज्याच्या हाती ही जबाबदारी सोपवली त्या महिलेनेच यावर हात साफ केल्याचा प्रकार नालासोपारा परिसरात उघडकीस आला आहे.
मागील महिन्यात पावसाने जो हाहाकार माजवत कोकणातील चिपळूण आणि महाड मधे अतिवृष्टीमुळे हजारो कुटंब निराधार झाले आहेत. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून या पूरग्रस्तांना मदतीचे हात पुढे येत आहेत. वसई विरार आणि नालासोपारा मधील महिला वस्तीस्तर बचतगट च्या ३३० महिलांनी पुढाकार घेत पुग्रस्तांना मदत म्हणून जीवन आवश्यकत वस्तू गोळा केल्या . नालासोपारा शाश्वती महिला बचत गटाच्या अध्यक्षा नीलम गायकवाड यांची खेड येथे ओळख असल्याने तो पोहचविण्याची जबादारी त्यांच्यावर सोपण्यात आली.
नीलिमा गायकवाड यांनी पद्धतशीरपणे योजना आखत हे सामान खेद येथे पोहचवून पूरग्रस्तांना वापट केल्याचे फोटो दाखवत सर्वांची दिशाभूल केली. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या रुचिता विश्वासराव यांनी हे फोटो पहिले असताना त्यांना संशय आला की हे फोटो एडीट केलेले आहेत. यामुळे त्यांनी नीलिमा गायकवाड यांची चौकशी केली असता. त्याच्या घरातच हे समान आढळून आले. त्यावरील महिला बचत गटांचे स्टीकर लावले होते. ते स्टीकर नीलिमा गायकवाड यांनी फाडून टाकले होते. आणि ज्या टेम्पोवालाची माहिती सुद्धा खोटी दिली.
नीलिमा गायकवाड यांनी माफी मागत हे सामान पुन्हा परत केले आणि चोरी गेलेले साहित्य परत करण्याचे आश्वासन दिले. नीलिमा गायकवाड यांच्याकडून महिला बचत गटांच्या महिलांनी सर्व सामान परत घेवून ते पुन्हा चिपळूण येथील पूरग्रस्तांना पोहचविण्याची व्यवस्था केली आहे.
“ अशा कुठलाही प्रकार झाला नाही, मी सामान चोरी जावू नये म्हणून एका घरात ठेवले होते. फक्त मी फोटो पाठविले ही माझी चूक झाली. आता हे सामान इतर महिला बचत गटांना मी सुपूर्त केले आहे. त्यानंतर मला काय झाले माहित नाही” – नीलिमा गायकवाड – अध्यक्ष शाश्वती महिला बचत गट