रेल्वेत महिलांची लुट करणारा आरोपी गजाआड.
विरार : वसईच्या एका महिलेची लोकल ट्रेनमध्ये मारहाण करून लुट करून पळून जाणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायलयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वसईत राहणाऱ्या ज्युली जयस्वाल, या १२ऑगस्टला मालाड येथुन मासे खरेदी करुन वसईला जाण्यासाठी बोरीवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र ४ वर आलेल्या सकाळी ७.५७ वा . वसई फास्ट ट्रेनचे मधल्या लेडीज सेकंडक्लास डव्यात चढुन प्रवास चालु केला, असता त्याच लेडीज डब्यात चढला व त्याने डाव्या हाताने त्यांच्या गळयाला पकडुन व उजव्या हाताने त्यांचे गालावर , कपाळावर, कानाजवळ, छातीवर बुक्क्यांनी मारहाण करुन २० मिनिटे मारहाण करीत होता.
त्याने ज्युली यांच्या कडून मोबाईल व रोख रक्कम चोरुन वसई स्टेशन येण्यापुर्वी गाडीतुन उडी मारुन पळुन गेला. याप्रकरणी बोरीवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केल्या नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शनिवारी वसईतून आकाश बाबु धोडे याला अटक केली असून न्यायलयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.