विरार : विरार पोलिसांनी बुधवारी एका ८ महिन्याच्या मुलीला २ लाख विकण्यासाठी आलेल्या चार आरोपिंना अटक करून मुलीची सुखरूप सुटका केली आहे. यात पोलिसांनी चार आरोपी अटक केले असून यात दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. यातील एक इसम हा डॉक्टर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १६ फेब्रुवारी पर्यंत यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर यांना गुप्त बातमीदाराच्या सहायाने माहिती मिळाली होती की, विरार पश्चिमेला एक इसम एका लहान बालकाला विकत घेणार आहे. यानुसार पोलिसांनी सापळा रचत या संपूर्ण टोळीला विरार पश्चिम बस आगारातून अटक केले आहे. आणि मुलीची सुखरूप सुटका करून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यातील चार आरोपींपैकी या मुलीचे आई वडील असल्याची बतावणी केलेले महिला पुरुष आहेत. तर दोन जन हे या मुलीचा सौदा करणारे आहेत. हे दोघेजण विरार मधील एका आश्रम चालकाला हे मुल विकणार होते. पण याचा आश्रमचालकाने पोलिसांना माहिती दिली होती. दाराचे मुल हे कलकत्ता प्रदेशातील आहे.
कलकत्ता येथील एका कुटुंबात एका महिलेच्या प्रसूती नंतर तिचा मृत्यू झाला होता. तिने एका मुलीला जन्म दिला होता. याच मुलीचा तिच्या मामीच्या मुलीने एका डॉक्टर च्या सहायाने विरार मध्ये २ लाखात सौदा केला होता. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांनी दिली आहे.