विरार : वसई विरार मध्ये रखडलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शुकवारी नालासोपारा आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. वसई पूर्व येथील इंद्रपस्थ रहिवाशी संकुलाला प्रथम गॅस पाईपलाईनचा बहुमान मिळाला आहे.
शुक्रवारी वसईच्या पूर्व परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुजरात गॅस या कंपनीकडून वसई विरार शहराला गॅस पाईपलाईन मिळणार आहे. येत्या डिसेंबर पर्यंत प्राथमिक तत्वावर इंद्रपस्थ रहिवाशी संकुलाला प्रथम गॅस पाईपलाईन सुरु करणायत येणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहरात याचे काम सुरु केले जाईल. तसेच या कंपनीची असलेली ५००० हजार रुपये अनामत रक्कम सुद्धा आमदार क्षितीज ठाकूर यांनी ९० टक्के सवलत मिळवून केवळ ५०० रुपयात वसई करांना ही जोडणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती आमदार क्षितीज ठाकूर यांनी दिली आहे.