महाराष्ट्रात करोना विषाणूचा वाढत संकट पाहता आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुटी देण्यात आली आहे. आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांना सुटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळी पावले उचलण्यात येत आहेत. दरम्यान आज खाजगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण स्वीकारण्याचेहि आदेश देण्यात आले. त्यांनतर आता सरकार शासकीय कार्यालयांना सात दिवसांसाठी सुटी देण्यात आली आहे. दरम्यान या आधी शाळा, महाविद्यालयांना सुटी, चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल्स यासह गर्दी होणाऱ्या संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
मुंबईवरील करोना विषाणूचा वाढत संकट पाहता आता मुंबईकराची लाईफलाईन लोकल सेवा व मेट्रो सेवा बंद होण्याची शक्यता आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी प्लॅटफॉर्म वरील गर्दी कमी करण्यासाठी तिकिटाचे दर वाढवण्यात आले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट १० वरुन ५० रुपये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील २०० स्थानकांवर या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.