Ads
बातम्या

Coronaमुळे सोने-चांदीला स्वस्ताई!

gold RATE
डेस्क desk team

कोरोनामुळे सोने आणि चांदी स्वस्त झाली आहे. मागील दहा दिवसात सराफा बाजारात सोनं प्रतितोळा सुमारे पाच हजारांनी स्वस्त होऊन ४० हजारांच्या खाली पोहोचलं. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

सोन्याच्या दरात १९४९ रुपयांनी घसरण होऊन प्रति दहा ग्रॅम ३९ हजार ६६१ रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ६४४५ रुपयांनी घसरला आहे. चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या दरात 455 रुपयांनी वाढ होऊन 41,610 रुपये प्रतितोळा झालं होतं. तर चांदी मात्र 1,283 रुपयांनी घसरुन 40 हजार 304 रुपये किलोंवर पोहोचली होती.

कोरोना व्हायरसचा परिणाम सराफा बाजारावरही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मात्र तरीही ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवल्याचंच चित्र आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: