वसई-विरार महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्या वतीने स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्याकडे आज २०२०-२१ या वर्षाचा २ हजार ४२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिकेचा हा नववा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विविध विकास कामासाठी रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान हा २ हजार ४२ कोटीचा अर्थसंकल्प आता १६ मार्चला महासभेत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे.
अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे
- मालमत्ता करात कुठल्याही प्रकारची वाढ नाही.
- शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक कामासाठी २१२ कोटी ८ लाख
- आरोग्य सेवेसाठी ६५ कोटी १३ लाख,गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावर्षी १९ कोटीची जास्त तरतूद.
- स्मशानभूमीच्या विकासासाठी ११ कोटी १ लाख रुपयाची तरतूद.
- नवीन मार्केट बांधणीसाठी ७ कोटी २६ लाख.
- दलित वस्ती योजना कामांसाठी ३ कोटी व प्रधानमंत्री आवास योजना व अन्य योजनांसाठी १ कोटीची तरतूद.
- महिला बालकल्याण योजनेतर्गत २३ कोटी ५४ लाखाची तरतूद.
- पाणी पुरवठ्यावर २७१ कोटी ८५ लाखाची तरतूद.