चीनमधून सुरु झालेला कोरोना व्हायरस जगभरात पसरू लागला आहे. या कोरोना व्हायरसने भारतात हि शिरकाव केला आहे. त्यामुळे विविध राज्यात या रुग्णांची संख्या वाढत चालली असून, यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. या संदर्भातील माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आरोग्यमंत्री टोपे यांनी रविवारी ९५ संशयितांना रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आज हि त्यांनी करोना संदर्भात दिलेली माहिती धक्कादायक आहे.करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून रुग्णांच्या संख्येत सोमवारी वाढ झाली आहे. अजून चार जणांना करोनाची लागण झाली. यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या ३७ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “चार रुग्णातील तिघे मुंबईतील तर एक नवी मुंबईतील आहे. यामधील दोन जण कुटुंबाच्या संपर्कात आले तर इतर दोघेजण परदेशात प्रवास करुन आलेले आहेत. पनवेलमधील विलगीकरण कक्षात ३३ जणांना ठेवण्यात आलं आहे. कोणीही पळून गेलेलं नसून चुकीची अफवा पसरली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशभरात करोनाचे ११० रुग्ण आढळलेत. या सर्वाधिक संख्या ही महाष्ट्रातील रुग्णांची आहे. महाराष्ट्रात करोनाचे ३३ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इराणहून आणखी ५३ भारतीय मायदेशात दाखल झाले आहेत. यात ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.