मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी कोसळला तर निफ्टीत ५०० अकांहून अधिक घसरण झाली. यात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.भारतात करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी बाजारात जोरदार विक्री केली. मात्र त्यांचे शेअर्स घसरले.
येस बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय स्टेट बँक आणि इतर सात गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला. येस बँकेच्या शेअरमध्ये मात्र १० टक्के वाढ झाली. तसेच अर्थ मंत्रालयाने बुधवारपासून येस बँकेवरील निर्बंध दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज येस बँकेच्या शेअरला मागणी दिसून आली.
शेअर घसरले
बीएसई फायनान्स निर्देशांक ७ टक्क्यांनी घसरला. इंडसइंड बँक ११ टक्क्यांनी घसरला आहे. त्याशिवाय मॅग्मा फिनकॉर्प, जेएम फायनान्शिअल, मुथूट फायनान्स, आयसीआयसीआय बँक, उज्जीवन , ऍक्सिस बँक, आयडीएफसी फर्स्ट.