चीनच्या वुहान शहरातून फैलावू लागलेल्या कोव्हिडि-19 म्हणजेच कोरोना व्हायरस डिसिसने संपूर्ण जगाला धास्तावून सोडल आहे. भारतातही हळुहळु व्हायरसने शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. व्हायरसचा संसर्ग थोडक्यात रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास केंद्र सरकारकडून खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ट्विट करत मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामने रंगणार आहेत. पावसामुळे पहिला सामना रद्द करण्यात आला तर कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या धोक्यामुळे उर्वरित दोन सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार असल्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. तसेच सर्व राष्ट्रीय क्रिडा संघटनांना प्रेक्षकांची गर्दी टाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
NEWS: The remaining two ODIs of the ongoing series between India and South Africa to be played behind closed doors #INDvsSA
Read More here 👉https://t.co/OU1BLRfg0v pic.twitter.com/r0QQNTJUlX
— BCCI (@BCCI) March 12, 2020
दोन्ही सघात होणारे हे सामने 15 आणि 18 मार्चला अनुक्रमे लखनौ आणि कोलकत्ता येथे खेळले जाणार आहेत. दरम्यान, हे सामने बघण्यासाठी आधीच तिकिट खरेदी केलेली असल्यास त्यांना आठवड्याभरात पैसे परत देण्यात येतील असे बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे.