स्मार्टफोन जगतात कमी काळात लोकप्रिय ठरलेली कंपनी ‘शाओमी’ आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर घेऊन आली आहे. शाओमीच्या ‘Redmi Note 8’ सीरिजला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीचा बहुप्रतिक्षित ‘Redmi Note 9 Pro’ आणि ‘Redmi Note 9 Pro Max’ हे स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहे. 12 मार्चला एका ऑनलाइन कार्यक्रमामध्ये हे दोन स्मार्टफोनची लाँचिंग करण्यात आली.
कधी खरेदी करता येणार?
‘Redmi Note 9 Pro’ आणि ‘Redmi Note 9 Pro Max’ हे दोन्ही स्मार्टफोन ग्राहकांच्या बजेटमध्ये असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ‘Redmi Note 9 Pro’ ग्राहकांना 17 मार्च तर ‘Redmi Note 9 Pro Max’ स्मार्टफोन ग्राहकांना 25 मार्चपर्यंत अॅमेझॉन इंडिया, एमआय होम स्टोर्स, एमआय डॉट कॉम वरून खरेदी करता येणार असल्याची माहिती कंपनीने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
The #RedmiNote9Pro will available from 17th March
and the #RedmiNote9ProMax from the 25th March
on https://t.co/cwYEXdVQIo, @AmazonIN, Mi Home & Mi Studio.RT if you cannot wait get your hands on them. #ProCamerasMaxPerformance #PerformanceBeast pic.twitter.com/ediM1qjdgF
— Redmi India (@RedmiIndia) March 12, 2020
फीचर्स
- 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
- स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर
- 48 आणि 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह 16 मेगापिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरा
- ऑरोरा ब्लू, ग्लेसियर व्हाइट आणि इंटरस्टेलर ब्लॅक तीन रंगात उपलब्ध
- 5020 एमएएच क्षमतेची बॅटरी
किंमत
Redmi Note 9 pro
4 GB Ram + 64 GB स्टोरेज = 12 हजार 999 रुपये
6 GB Ram + 128 GB स्टोरेज = 15 हजार 999 रुपये
Redmi Note 9 Pro Max
4 GB Ram + 64 GB स्टोरेज = 14 हजार 999 रुपये
6 GB Ram + 128 GB स्टोरेज = 16 हजार 999 रुपये
8 GB Ram + 128 GB स्टोरेज = 18 हजार 999 रुपये
Here’s a quick look at what the #RedmiNote9Pro has to offer! The #PerformanceBeast is BACK! Ready for the prices? pic.twitter.com/BTNVSxnxYH
— Redmi India (@RedmiIndia) March 12, 2020