डोळ्याखाली डार्क सर्कल येण्याची समस्या सध्या अनेकांना धास्तावत आहे. चेहऱ्याचा रंग गोरा असला तरी डोळ्याखाली काळपट असल्याने सौंदर्यास बाधा निर्माण होते. कारण चेहऱ्यांचे सौंदर्य डोळ्यांमुळेच वाढत असते. त्यामुळे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपाय करत असता पण फरक काही पडत नाही. असे असल्याने आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करण्यात येणारे उपाय सांगणार आहोत. या उपायामुळे नक्कीच डार्क सर्कलची समस्या दूर होईल.
जाणून घ्या उपाय
- टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करुन डोळ्यांभोवती लावल्यास काळपटपणा दूर होतो. तसेच टोमॅटोमुळे चेहऱ्याचा ग्लोसुद्धा वाढतो.
- बटाट्याचे छोटे स्लाईस किंवा कच्च्या बटाट्याचा रससुद्धा डोळ्याभोवती लावल्यास त्याचाही अधिक चांगला फायदा होतो.
- लिंबाचा रस आणि काकडीचा रस एकत्र करुन डोळ्याखालील भागाला 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल्सवर दूर होऊन तुमचे डोळे अधिकच आकर्षित दिसण्यास मदत होईल.
- 1 चमचा बदाम पेस्ट आणि दूध यांचे एकत्रित मिश्रण डोळ्यांखाली लावले तर डोळ्याखालील काळपटपणा दूर होतो आणि चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसेल.
- काकडी शरीरासाठी थंड असते. तसेच ती डोळ्यांसाठी देखील लाभदायक ठरते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिटे डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात.