नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळात विविध जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतासाठी असून 15 मार्च 2020 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
LIC मध्ये जाहीर झालेल्या भरतीत सहाय्यक अभियंता (AE) यापदासाठी 50 जागा तर सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (AAO) पदासाठी 168 जांगा अशा एकूण 218 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: B.Tech/B.E. (सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल)/ B. Arch.+3 वर्षे अनुभव किंवा M. Tech / M.E. (स्ट्रक्चरल)+1 वर्ष अनुभव
- पद क्र.2: CA/ पदवीधर/ LLB/ LLM/ MCA/ M.Sc (कॉम्पुटर सायन्स)/ कॉप्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ IT पदवी/ हिंदी पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा
दरम्यान, या भरतीसाठी उमेदवार 21 ते 30 वर्षांचा असणे गरजेचा आहे. यात SC/ST च्या उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शुल्क आणि परिक्षा
या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 700 रूपये तर मागासवर्गींना 85 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. भरती आधी पूर्व परिक्षा घेतली जाणार आहे. ही पूर्व परिक्षा 4 एप्रिलला असून प्रवेशपत्र 27 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत काढण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी- पाहा