राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला ३ जागा आल्या होत्या. यामध्ये दोन उमेदवारांची नावे जाहीर झाली होती. आता तिसरे नाव जाहीर करण्यात आले आहे.
भाजपने राज्यसभेच्या तिसर्या जागेसाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष व औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड यांचे नाव जाहीर केले आहे. यामुळे उदयनराजे भोसले, रामदास आठवले व डॉ. भागवत कराड असे भाजपाचे तीन उमेदवार निश्चित झाले आहेत.
उमेदवारी अर्ज
उदयनराजे भोसले व रामदास आठवले यांनी आज आपला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या वेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपाच्या अन्य नेत्यांची उपस्थिती होती. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १३ मार्च (उद्या) असल्याने आज संध्याकाळ पर्यंत अथवा उद्या डॉ. भागवत कराड यांचाही अर्ज भरला जाणार आहे.