रेल्वे प्रशासनाकडून दरवेळी रेल्वेच्या दुरूस्तीची कामे करण्यासाठी रविवार हा दिवस राखीव असतो. मात्र, काहीवेळी अधिक कामे पार पाडण्यासाठी विशेष रात्र कालीन ब्लॉक जाहीर केले जातात. मध्य रेल्वेकडून नुकाताच टिटवाळ्यातील पादचारी पुलाचे गर्डरच्या कामांसाठी शुक्रवार ते शनिवार आणि शनिवार ते रविवार मध्यरात्री विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. हा ब्लॉक कल्याण ते कसारा दरम्यान अप-डाऊन मार्गावर घेतला असून यामुळे लोकल, मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
वेळ
दरम्यान, घोषित केलाला ब्लॉक 13 मार्चला मध्य रात्री 2 वाजल्यापासून 14 मार्चच्या पहाटे 6 वाजेपर्यंत तर 14 मार्चला रात्री 11.50 ते 15 मार्च पहाटे 3.50 वाजेपर्यंत असणार आहे.
या गाड्यांवर ब्लॉकचा परिणाम
शुक्रवारी रद्द झालेल्या मेल-एक्स्प्रेस
- ट्रेन 17611 नांदेड ते सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
- ट्रेन 12112 अमरावती ते सीएसएमटी एक्स्प्रेस
- ट्रेन 11402 नागपूर ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस
- ट्रेन 51154 भुसावळ ते सीएसएमटी पॅसेंजर
शनिवारी रद्द झालेल्या मेल-एक्स्प्रेस
- ट्रेन 12118 मनमाड ते एलटीटी एक्स्प्रेस
- ट्रेन 17612 सीएसएमटी ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
- ट्रेन 12111 सीएसएमटी ते अमरावती एक्स्प्रेस
- ट्रेन 11401 सीएसएमटी ते नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस
- ट्रेन 51153 सीएसएमटी ते भुसावळ पॅसेंजर
- ट्रेन 12117 एलटीटी ते मनमाड एक्स्प्रेस
शनिवारी पहाटे रद्द झालेल्या लोकल
- कल्याण ते आसनगाव- प. 5.28 वा.
- सीएसएमटी ते कसारा- प. 4.15 वा.
- विद्याविहार ते टिटवाळा- प. 4.51 वा.
- विद्याविहार ते टिटवाळा- प. 5.12 वा.
- टिटवाळा ते सीएसएमटी- प. 4.32 वा.
- टिटवाळा ते सीएसएमटी- प. 5.35 वा.
शनिवारी रात्री रद्द झालेल्या लोकल
- सीएसएमटी ते टिटवाळा- रा. 10.00 वा.
- सीएसएमटी ते टिटवाळा- रा. 10.51 वा.
- सीएसएमटी ते टिटवाळा- रा. 11.44 वा.
- टिटवाळा ते सीएसएमटी- रा. 8.12 वा.
- टिटवाळा ते सीएसएमटी- रा. 9.00 वा.
- टिटवाळा ते सीएसएमटी- रा. 10.06 वा.
तासभर उशिरांने धावतील
- ट्रेन 18030 शालिमार ते एलटीटी एक्स्प्रेस
- ट्रेन 12810 हावडा ते सीएसएमटी व्हाया नागपूर
- ट्रेन 12102 हावडा ते सीएसएमटी जनेश्वरी एक्स्प्रेस
- ट्रेन 12106 गोंदिया ते सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस
- ट्रेन 17058 सिकंदराबाद ते सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस
- ट्रेन 12290 नागूपर ते सीएसएमटी दुरोन्तो एक्स्प्रेस
- ट्रेन 11402 नागपूर ते सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस