चौदा विद्या, चौसष्ट कला, बुद्धीचा देवता, अधिपती मानणाऱ्या गणपतीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. गणपतीची आराधना भक्त अनेक प्रकारे करत असतात. त्यातील एक भक्तीचा प्रकार म्हणजे संकष्टी चतुर्थी. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. एक वर्षात 12 तर अधिकमास असल्यास 13 संकष्टी येतात. प्रत्येक जण भक्ती भावाने संकष्टी चतुर्थी साजरी करतात. फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज 12 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे.
जाणून घेऊयात व्रत पुजेबद्दल
संकष्टी चतुर्थी हे भक्ती भावाने पूर्ण करण्याचे एक व्रत आहे. महिलाच नाही तर पुरूषही हे व्रत करतात. या व्रतात पुर्ण दिवस उपवास करून चंद्रोदयानंतर गणपतीला महानैवेद्य दाखवला जातो. गणपतीची आराधना करत मंत्र मुग्ध करत पुजा केली जाते. त्यानंतर भोजन केले जाते.
चद्रोदयाची वेळ
- मुंबईः रात्री 9 वाजून 39 मिनिटे
- ठाणेः रात्री 9 वाजून 38 मिनिटे
- पुणेः रात्री 9 वाजून 34 मिनिटे
- रत्नागिरीः रात्री 9 वाजून 36 मिनिटे
- कोल्हापूरः रात्री 9 वाजून 32 मिनिटे
- साताराः रात्री 9 वाजून 33 मिनिटे
- नाशिकः रात्री 9 वाजून 36 मिनिटे
- अहमदनगरः रात्री 9 वाजून 31 मिनिटे
- धुळेः रात्री 9 वाजून 32 मिनिटे
- जळगावः रात्री 9 वाजून 29 मिनिटे
- वर्धाः रात्री 9 वाजून 16 मिनिटे
- यवतमाळः रात्री 9 वाजून 18 मिनिटे
- बीडः रात्री 9 वाजून 27 मिनिटे
- सांगलीः रात्री 9 वाजून 30 मिनिटे
- सावंतवाडीः रात्रौ 9 वाजून 33 मिनिटे
- सोलापूरः रात्री 9 वाजून 25 मिनिटे
- नागपूरः रात्री 9 वाजून 14 मिनिटे
- अमरावतीः रात्री 9 वाजून 20 मिनिटे
- अकोलाः रात्री 9 वाजून 23 मिनिटे
- औरंगाबादः रात्री 9 वाजून 29 मिनिटे
- भुसावळः रात्री 9 वाजून 28 मिनिटे
- परभणीः रात्री 9 वाजून 23 मिनिटे
- नांदेडः रात्री 9 वाजून 20 मिनिटे
- उस्मानाबादः रात्री 9 वाजून 25 मिनिटे
- भंडाराः रात्री 9 वाजून 12 मिनिटे
- चंद्रपूरः रात्री 9 वाजून 13 मिनिटे
- बुलढाणाः रात्री 9 वाजून 26 मिनिटे
- मालवणः रात्री 9 वाजून 34 मिनिटे