चीन मधील वुहान शहरातून उदयास आलेला आणि सध्या संपूर्ण जगभरात धास्तीचे वातावरण निर्माण करणारा ‘कोव्हि़डि-19’ म्हणजेच ‘कोरोना व्हायरस डिसिस’ने भारतातही शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर थोडक्यात नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना खबरदारीमुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. आता पर्यंत या भयंकर व्हायरसवर प्रतिबंधक लस शोधण्यास संशोधक अपयशी ठरले आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट प्रेमींनी कोरोनावर चांगलाच उपाय शोधून काढला आहे.
सध्या मुंबईत Road Safety World Series स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारत, वेस्ट इंडिज, ऑस्टेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका अशा संधाच्या माजी खेळाडूत हे सामने रंगत आहेत. 10 मार्चला पार पडलेल्या भारत आणि श्रीलंका मधील सामन्यातील एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोसा व्हायरस संबंधातील हा पोस्टर आहे. ‘ज्यात आम्हाला कोरोनाची चिंता नाही, कारण आम्ही सचिनचे चाहते आहोत’, अशा प्रकारचा आशय लिहिलेला आहे.
दरम्यान, Indian Legends संघाने या स्पर्धेत विजयाची घौडदोड कायम ठेवली आहे. श्रीलंका संघाने भारतीय संघापुढे 139 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताला विजय मिळवण्यासाठी 140 धावांची गरज होती. सुरूवातीच्या फलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी झाली असली तरी इरफान पठाणच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाने लंकेवर 5 गडी राखून विजय मिळवला. इरफान पठाणने नाबाद राहत 57 धावा केल्या.