नुकतीच नेटप्लीक्स या प्रसिद्ध वेबसीरीज अॅपवर जामतारा ही वेबसीरीज आली होती. तरुणाईला सध्या वेबसीरीज पाहण्याच व्यसन जडल असून, वेबसीरीज मधील कथानक हे वास्तवात घडलय. जामतारा सारख काहीस प्रकरण वसईत उघडकीस आल आहे. मुलींच्या आणि महिलांच्या आवाजात मोठे व्यापारी तसेच सोनारांना अतिशय चलाखीने गंडा घालणाऱ्या एका चोराच्या वसईच्या माणिकपुर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अतापर्यंत कलम 420 अंतर्गत या इसमावर मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात 22 गुन्ह्यांची नोंद आहे. दरम्यान, माणिकपुर पोलिसांनी सापळा रचत या सराईत चोराला अटक केली आहे.
बाजारपेठेतील मोठे व्यापारी, ज्वेलर्स यांना हा इसम फोन करत असे. त्यांच्या दुकाना बाजुला किंवा वर असलेल्या रुग्णालयातील महिला डॉक्टर आपण बोलत असल्याच तो सांगायचा. यानंतर सुट्ट्या पैशांची मागणी करुन ते पैस हॉस्पिटलमध्ये तुमच्या माणसा मार्फत पाठवा मी त्याच्याकडे बंद्या नोटा देते असे तो सांगायचा. या नंतर सुट्टे पैसे घेऊन येणाऱ्या माणसाला मध्येच आडवुन हा इसम त्याच्याकडुन पैसे घेऊन फरार व्हायचा.
हा इसम पनवेल येथील रहिवासी असून, नालासोपारा येथे तो गेल्या काही दिवसांपासून एका महिले सोबत राहात होतो. 2014 साली एका इंन्शुरन्स ऑफिसमध्ये असेच सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने त्यांना 50 हजारांचा गंडा घातला होता. पालघर जिल्ह्यात त्याच्यावर 420 अंतर्गत 6 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 तारखे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.