होळी म्हंटले की विविध रंग हे आलेच. मात्र, नागरिक होळीत वापरतात ते रंग केमिकल्स .युक्त असल्याने त्याचा परिणाम त्वचेवर होतो. होळीनंतर अनेक दिवस रंग तसाचा तसा चेहऱ्याच्या त्वचेवर आणि केसांवर दिसत राहतो. त्यामुळे आज आम्ही त्वचेवर राहिलेला रंग कसा काढायचा या संबंधीत सांगणार आहोत.
>> दोन चमचा कच्चे दुध आणि एक चमचा खोबरेल तेल तसेच चिमुटभर हळद एकत्र मिसळा. हे मिश्रण थोडंस चेहऱ्यावर लावा, आणि चेहरा धुवून घ्या, रंग सहज निघून जाईल.
>> सफरचंद उकळून घ्या, यात थोडासा संत्रीचा रस मिसळा, थंड करा आणि त्वचेवर हे मिश्रण लावा, रंग धुतल्यावर लगेच निघतली.
>> सरळ पपईचा गर चेहऱ्याला लावा, रंग निघून जातील, आणि त्वचाही उत्तम होईल.
>> मुल्तानी माती, ग्लिसरीन आणि लिंबाचा रस मिसळा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, नंतर 15 मिनिटांनी धुवा, रंग निघून जाईल.
>> रंगातील केमिकल्समुळे अनेक वेळा खाज सुटते, यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे व्हिनेगर टाका. त्वचेला लावा आराम मिळेल.
>> रंग खेळण्यापूर्वी डोक्याला खोबरेल तेल लावा, यामुळे रंग सहज निघतील आणि केसाना इजा होणारा नाही.