होळी सण हा रंगांशिवाय अपूर्ण आहे. लाल, पिवळा, नारंगी, हिरवा, पोपटी, तपकीरी अशा नानाविध रंगानी होळी सण जल्लोषात साजरा केला जातो. पण काही वर्षांपासून होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारे रंग आरोग्यास घातक ठरू लगल्याने होळीचा उत्साह लोप पावलेला दिसतो. त्यामुळे त्वचा, डोळे तसेच श्वसनाचे त्रास संभावतात. मात्र, आद्याप आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या या रंगाचा वापर बंद झाला नाही आहे. त्यामुळे सुरक्षित होळी खेळण्यासाठी आज आम्ही तुम्हाला नैसर्गिक रंगाची निर्मिती करण्याची साधी आणि सोपी पद्धत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घरच्या घरी विविधरंगी रंग बनवता येतील.
लाल रंग
रक्तचंदनाच्या सालीपासून लाल रंग तयार करता येतो. तसेच गुलालला हा एका चांगला पर्याय असू शकतो. बीट पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो. पाण्याचे प्रमाण वाढवल्यास गुलाबी रंग पण तयार करता येऊ शकतो. याखेरीज जास्वंदाची वाळलेली फुले आणि सेंद्रिच्या बियांचा पण तुम्ही वापर करू शकता.
हिरवा रंग
गुलमोहर, मेहंदीची पाने आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पिठामध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा तयार करून या मिश्रणात मिसळा. म्हणजे हिरवा रंग तयार होईल.
केसरी रंग
केसरी रंग तयार करण्यासाठी झेंडूची फुले चांगला पर्याय आहेत. याशिवाय पळसाच्या फुलांपासून केसरी रंग तयार करता येऊ शकतो. यासाठी १०० ग्राम पळसाची फुले जवळ जवळ एक बादली पाण्यात उकळून किंवा नुसती भिजवून ठेवावीत. सकाळी त्यातला अर्क बाहेर काढावा किंवा अर्क पाण्यात आणखी मिसळल्यास गर्द केसरी रंग तयार होतो.
निळा रंग
निळा जास्वंद आणि जकरांडाच्या फुलांपासून निळ्या रंगाची भुकटी तयार करता येते. गुलाबी कचनार या वनस्पतीच्या फुलापासून आणि बीट पासून निळ्या रंगाचे द्रावण तयार होते.
पिवळा रंग
हळद आणि मक्याचं पीठ किंवा बेसन एकत्र करून पिवळ्या रंगाची पेस्ट तयार करता येते. या पेस्टने धुळवड खेळल्यास त्यातल्या औषधी गुणधर्मामुळे त्वचेला फायदा होतो. बेसन आणि मक्याच्या पिठाला पर्याय म्हणून मैदा, तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरता येऊ शकते. पिवळा हर्बल रंग बनवण्यासाठी 200 ग्राम अरारोटची भुकटी, 100 ग्राम हळद, 50 ग्राम पिवळ्या झेंडूची फुले, 20 ग्राम संत्र्यांच्या साली, 20 थेंब लिंबाचे तेल एकत्र करून पिवळा हर्बल गुलाल तयार होतो.
गुलाबी रंग
गुलाबी रंग घरच्या घरी बनवायचे असेल तर गुलाबाच्या पाखळ्या वेगळ्या करून एका मोठ्या भांड्यात कढू कडकडीत उन्हात ठेवून द्या त्यानंतर पूर्णपणे कोरडी झाल्यावर मिक्सरला लावून घ्या. त्यानंतर तुम्हचा गुलाबी रंग तयार होईल.