मराठी महिना फाल्गुन महिन्याचा हा शेवटचा काळ असून, याच दिवसाच होळी हा सण येत आहे. तेंव्हा हा अठवडा आपल्या आय़ुष्यात कोणते रंगभरणार आहे, जाणून घ्या.
मेष :
हा आठवडा काहीसा अधिक कामाचा आणि तणावाचा असणार आहे. त्यामुळे व्यावसायिक बाबीत अधिक व्यस्त राहिल्याने आपल्या प्रियव्यक्तीस आपण पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. कला क्षेत्रातील मंडळींसाठी हा अठवडा प्रसिद्ध आणि यश मिळवुन देणारा ठरणार आहे. नोकरदारांसाठी मात्र हा अठवडा नोकरी धोक्यात येण्याचा तसेच अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
वृषभ :
राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मंडळींसाठी हा अठवडा काहीसा त्रासदायक आणि डोक्याला ताप देणारा ठरु शकतो. प्रॉपर्टीसंबंधी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात, तेव्हा ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरू शकतो. व्य़वसायीक मंडळींच्या कामात अऩेक अडथळे य़ेऊ शकतात. त्यामुळे कामात विलंब होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात उत्साह जाणवेल. मात्र, तांत्रिक विषयांचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास संथ गतीने होईल.
मिथुन :
.या आठवड्यात तुम्ही योग्य नियोजन केल्यास तुमची अनेक कामे मार्गी लागतील. तुमचे कोणाकडुन काही येण असेल तर सुसंवादाने ते वसुल करण्यास चांगला काळ आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या कामाची दखल घेतली जाऊन कौतुक होईल. नोकरी तसेच व्यवसायिक मंडळींसाठी हा आठवडा सर्वसाधारण राहिल.
कर्क :
नोकरदार तसेच व्यवसायिक मंडळींना या आठवड्य़ात अनेक प्रलंबित कामांवर तुम्हाला उपाय सापडण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा वाजवणारा आहे. तेंव्हा विशेष खबरदारी घ्या. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नका. वेळीच खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. विद्यार्थ्यांसाठी अधिक श्रमाचा आठवडा असेल.
सिंह :
नोकरदार मंडळींना वरिष्ठांची मर्जी संपादन करुन बढती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण, क्रीडा, तांत्रिक क्षेत्रांत प्रगती साधता येईल. .नवीन संबंधांची सुरवात करून जीवनातील नव्या अध्यायाचा प्रारंभ करण्यास हा आठवडा शुभ आहे. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा उत्तम असल्ये प्रत्येका कामात उत्साह जाणवेल.
कन्या :
नोकरदार मंडळींचे कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. तेंव्हा तोंडावर ताबा ठेवा. व्यवसायिक मंडळींनी आर्थिक व्यवहारात तज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकावे. घरामध्ये देखील वाद विवाद होण्याची शक्यता आहे. आपले म्हणणे इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. थोडक्यात हा आठवडा तुमच्या संयमाची परिक्षा घेणार अठवडा असणार आहे.
तुळ :
प्रेमी युगुल तसेच नव विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जोडीदाराच्या शोधात असलेल्या मंडळींचा य़ा आठवड्यात शोध पुर्ण होण्याची शक्यता आहे. प्रवासा दरम्यान आपली आर्थिक फसवणूक किंवा आरोग्य विषयक समस्या उदभवण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या. नोकरी व्यवसायात योग्य संधीचा उपयोग करुन घेतल्यास लाभ होईल.
वृश्चिक : या आठवड्यात आपल्या खर्चाचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता असल्याने आपल्यावर आर्थिक बाबतीत ताण येईल. नोकरी तसेच व्यवसायात सहकाऱ्याच्या किंवा भागीदाराच्या चुकीचा तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करताना स्वतासाठी वेळ न काढल्याने तुमचे काहीसे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. मानसिक शांततेसाठी आपण आध्यात्मिकतेकडे वळण्याची शक्यता आहे.
धनु :
नवीन कार्य सुरु करण्यास हा आठवडा अनुकूल आहे. व्यवसायात विस्तार किंवा नोकरीत चांगल्या संधीबद्दल गंभीरपणे विचार करावा. एखाद्या गोष्टी विषयी चिंता करण्या पेक्षा चिंतण करण्याची अवश्यकता आहे. व्यवसायिक दृष्या काहीशी प्रगती होऊ शकतो. ओळखीचा लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर :
या आठवड्यात आपण रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अकारण एखादा वाद ओढवण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळी तसेच व्यवसायिक मंडळींच्या प्रयत्नांना या आठवड्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. राजकीय तसेच कलाक्षेत्रातील मंडळींसाठी देखील अनेक चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. घरातील वातावरण या आठव़ड्यात चांगले असणार आहे.
कुंभ :
व्यावसायात अचानक मोठा नफा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मात्र एखादा वादाचा प्रसंग उद्भभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळलेले राहिल. उत्तरार्धात मात्र आपल्यातील उत्साह परतलेला असेल. या आठवड्यात तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे.
मीन :
व्यापार आणि आर्थिक व्यवहारांसाठी या आठवड्यात निर्णय घेताना कोणतीही घाई करु नका. वरिष्ठांचा तसेच तज्ञांच्या सल्ल्या शिवाय निर्णय घेतल्यास माहागात पडु शकते. अडचणींवर मात करण्यास प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. कुटुंबासोबत पारदर्शकता ठेवा, चर्चा करा. आपल्या जोडीदाराचे मत देखील विचारात अवश्य घ्या. आपल्याला आरोग्य विषयक काही समस्या उद्भवण्याची देखील शक्यता आहे.