जगातील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपचे असंख्य युजर्स आहेत. हे युजर्स व्हॉट्सअॅपवर विविध स्टेट्स ठेवत असतात. हि स्टेटस आपल्याला आवडतात, मात्र ती आपण ते डाउनलोड करू शकत नव्हत. त्यामुळे युझर्सची निराशा व्हायची. हि नाराजी पाहता आम्ही तुमच्यासाठी व्हॉट्सअॅपने स्टेट्स सेव्ह करणारी खास ट्रिक्स घेऊन आलोय.
अनेकदा आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणीचे स्टेट्स आवडते. ते डाउनलोड करता येत नाही. परंतु, फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन ते फोनमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह करता येऊ शकता येते. व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन काही फायदा होणार नाही. त्यामुळे काही खास ट्रिकचा वापर केल्यास ते स्टेट्स फोनमध्ये सेव्ह करता येऊ शकता येते.
जाणून घ्या ट्रिक्स
- प्ले स्टोर मध्ये जावून Google Files अॅपला डाउनलोड करा
- अॅप ओपन करा आणि टॉप राइट कॉर्नर मध्ये दिलेल्या मेन्यू ऑप्शन वर जा.
- Settings ऑप्शन मध्ये जावून Show hidden files ऑप्शनला ऑन करा.
- यानंतर अॅपमध्ये डावीकडे जा आणि खाली दिलेल्या Browse वर टॅप करा
- येथून Internal storage मध्ये जा
- आता WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जावून Media मध्ये जा
- येथे Statuses फोल्डर दिसेल
- या फोल्डर मध्ये तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींचे व्हॉट्सअॅप स्टेट्स दिसेल
- तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ ओपन करायचा आहे. त्या नावाच्या पुढे डाउनलोडचा पर्याय (v) वर टॅप करा
- या ठिकाणी खूप सारे पर्याय उघडे होतील. ज्यात Copy To या पर्यायाची निवड करा
- आता Internal storage ची निवड करा. तुमच्या पसंतीच्या फोल्डरमध्ये सेव्ह करा.