देशभरातील एनआयटी, आयआयटी आणि राज्य सरकारी अनुदानित संस्थांमधील इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळण्यासाठी घेतली जाणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (JEE Main) परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अखेरची मुदत आधी ६ मार्चपर्यंत होती, ती वाढवून १२ मार्च करण्यात आली होती. त्यामुळे अर्ज भरण्याची आज शेवटची संधी आहे.
इंजिनीअरींग क्षेत्रात प्रवेश करण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्याना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेवसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. Jee Main April 2020 चे अॅडमिट कार्ड 16 मार्च पासून मिळणार आहेत. JEE ची परिक्षा 5, 7, 8, 9 आणि 11 एप्रिलला असणार आहे. तर निकाल 30 एप्रिलच्या दरम्यान जाहीर होणार आहे.
अर्ज कसा भरावा?
- jeemain.nta.nic.in ही परीक्षेची अधिकृत वेबसाईट ओपन करावी.
- होमपेजवरील JEE Main April 2020 रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा.
- नाव, पालकांचे नाव, पत्ता, इमेल आयडी, फोन नंबर, शैक्षणिक पात्रता, परीक्षा केंद्र आणि अन्य माहिती भरा.
- तुमच्या स्वाक्षरीची आणि छायाचित्राची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- ऑनलाइन अॅप्लिकेशन फी भरा आणि रेफरन्स क्रमांक नोंदवून ठेवा.
- एक पुन्हा तुमचा JEE Main April 2020 अर्ज नीट तपासून पाहा आणि सबमीट करा.
- अर्जाचं प्रिंट आऊट काढून तुमच्या माहितीसाठी तुमच्याजवळ ठेवून घ्या.