येत्या 29 मार्चपासून ‘IPL’ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. तर पाकिस्तानमध्ये सध्या ‘पाकिस्तान सुपर लीग’ स्पर्धा सुरू आहे. या सुपर लीगमधील सामन्यातील एक अजब व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लाहोर कलंदर्स संघातून खेळत असणाऱ्या ख्रिस लिनचा आहे.
नेमके काय घडले?
‘पाकिस्तान सुपर लीग’ स्पर्धेत लाहोर कलंदर्स आणि पेशावर यांच्यात सामना सुरू होता. लाहोर कलंदर्स सलामीवीर ख्रिस लिन मैदानात खेळत होता. त्यांनी 15 चेंडूत 30 धावा करत मैदानात चांगलाच जम धरायला सुरूवात केली होती. तेवढ्यात पेशावर संघाचा गोलंदाज ग्रेगोरीच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात तो बाद झाला. चांगल्या लयात असताना बाद झाल्यामुळे तो रागानी लालबुंद झाला. त्यावेळीच तंबूत परत जाताना आपल्या डोक्यावरील हेल्मेट उतरवताच आश्चर्यचकीत करणारे दुश्य दिसले. हे दुश्य म्हणजे हेल्मेट काढताच चक्क त्याच्या डोक्यातून वाफा निघत होत्या.
The Steaming Head #ChrisLynn #PSL2020 #LahoreQalandars pic.twitter.com/pKMjtr0Vb1
— Dubai Realty Matters (@DubaiMatters) February 28, 2020
दरम्यान, हा सर्व प्रकार नेमका घडला तरी कसे? हे अद्याप समजले नाही. मात्र, फलंदाज ख्रिस लिनच्या डोक्यातून येणारा वाफा या रागाच्या भरात निघाल्या असल्याचे नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत भावना व्यकत केल्या आहेत.