नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून 15 मार्च 2020 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 3 जागा, सहाय्यक अभियंता (यांत्रिकी/विद्युत) साठी 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी 1 जागा, लिपिक टंकलेखकसाठी 5 जागा, गाळणी निरीक्षकसाठी 1 जागा, अनुरेखक पदासाठी 1 जागा आणि पंपचालक या पदासाठी 1 जागा अशा एकूण 14 पदांसाठी ही भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता
- पद क्र.1: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
- पद क्र.2: यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी.
- पद क्र.3: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा.
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT
- पद क्र.5: रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी.
- पद क्र.6: (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/ विद्युत/ यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण. (ii) Auto Cad
- पद क्र.7: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (तारतंत्री)
वयोमर्यादा आणि शुल्क
दरम्यान या भरतीसाठी उमेदवार किमान 18 ते कमाल 43 वर्षांपर्यंतचा असणे गरजेचे आहे. तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 500 रूपये तर माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नाही.
अधिक माहितीसाठी- पाहा