गेल्या काही वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टी सुजाण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सामाजिक असो वा विनोदी संहिता उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात जात आहेत. तसेच मराठी चित्रपटातील विनोदी संहिता महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी एक प्रकारची पर्वणीच ठरते. अशीच एक चित्रपट गृहात आणि घरा घरात हास्यकल्लोळ माजवणारा चित्रपट युक्ती इंटरनेशनल लवकरच घेऊन येत आहे. या विनोदी पर्वणी देणाऱ्या चित्रपटाचे नाव झोलझाल आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मानस कुमार दास यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.
काय आहे पोस्टरमध्ये?
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये बोल्ड अंदाजात उभी असलेली एक तरूणी तर दुसऱ्या बाजूला हातात पाईप घेऊन उभा असलेला एक व्यक्ती दिसत आहे. तसेच त्यांच्या मध्ये एका आलीशान महालाचा फोटो पाहायला मिळत आहे. या दोघ्यांच्यामध्ये या महालाचा फोटोमुळे त्या दोघांचा या महालाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच पोस्टरवर दिसणारी पैशाची बॅग, नेत्याची टोपी, पोलीस टोपी, बंदुक या गोष्टींमुळे डोक्यात मोठा गोंधळ निर्माण होत आहे. मात्र हा ‘झोल’ नक्की कसला ‘झोल’ आहे? कोण करतोय आहे हा झोल? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर येत्या 1 मे रोजी मिळणार आहेत.
‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए.गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले असून अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता आहेत. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता शिवाजी डावखर असून मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.