सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने पुन्हा एकदा भारतीय बाजारात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. कंपनीने आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक खास प्रीपेड प्लान आणले आहेत. ज्यामुळे इतर नेटवर्कच्या युजर्सनाही आपल्याकडे खेचला येईल. तर जाणून घेऊयात BSNL चे खास प्लान्स….
551 रूपयांचा प्लान
कंपनीच्या या प्लानमध्ये युजर्सना दररोज 5 जीबी डेटा दिला जाणार असून एकूण 450 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र, या प्लानमध्ये एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत नाही. तसचे ही सुविधा 3 जी नेटवर्क वापरणाऱ्यांसाठी असून 90 दिवसांची वैधता असणार आहे.
109 रूपयांचा प्लान
या प्लानमध्ये युजर्संना 5 जीबी डेटा दिला जातो. युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये कॉलिंगसाठी दरदिवस 250 मिनिट मिळणार आहेत. या पॅकची वैधता ९० दिवस आहे.
1699 रूपयांचा प्लान
या प्लानमध्ये युजर्संना दरदिवस 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस सुविधा दिली जातेय. युजर्संना या पॅकमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकतात. या पॅकची वैधता 365 दिवस इतकी आहे.
1999 रूपयांचा प्लान
या प्रीपेड प्लानमध्ये 80 दिवस केबीपीएसच्या स्पीडने 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा दिली जाते. तसेच युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट तर बीएसएनएल टीव्ही आणि ट्यून्सची सेवा मोफत दिली जातेय. या पॅकची वैधता 356 दिवस आहे.