Ads
स्पोर्टस

भारताची शफालीच एक नंबर!

shafali verma
Avatar
डेस्क desk team

टी २० विश्वचषकात दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी २० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ICC ने महिला टी २० क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल १९ स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे.

न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला शफालीने मागे टाकले. सुझी बेट्स हिची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी घसरली आहे. सुझीचे ७५० गुणांक आहेत, तर शफाली ७६१ गुणांकासह अव्वल आहे. ऑक्टोबर २०१८ पासून सुझी अव्वल स्थानी होती. अखेर १७ महिन्यांनी तिला दुसऱ्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.

शफालीचा विक्रम
शफालीने भारताला दमदार कामगिरी करून देत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी २० जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली. याशिवाय भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी २० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

About the author

Avatar

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: