अश्लील चित्रफित व्हायरल झाल्यानंतर बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्यात अडकलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये आपल्या विरोधातील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.
Video; भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा राजीनामा
मीरा-भाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्ष सदस्यत्वाचा काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपच्याच एका नगरसेविकेने मेहता यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच गेल्याच आठवड्यात अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर नरेंद्र मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप माजी आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल
याप्रकरणी अटकेची शक्यता असल्याने मेहता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. येत्या 9 मार्चला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.