महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020 जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही पूर्व परिक्षा तब्बल 806 जागांसाठी असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
पद आणि जागा
सदर भरतीत सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) साठी 67 जागा, राज्य कर निरीक्षक (गट-ब) साठी 89 जागा आणि पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) साठी 650 जागा अशा एकूण 806 जागा भरणे आहे.
शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता
जाहीर झालेल्या भरतीसाठी पदवीधर उमेदवारांना प्रधान्य दिले जाणार आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी पुरूषांसाठी उंची 165 से.मी आणि छाती 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त तर महिलांसाठी उंची 157 से.मी असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा
- पद क्र.1: 01 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 01 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 01 जून 2020 रोजी 19 ते 31 वर्षे
- मागासवर्गीय आणि अनाथ: 05 वर्षे सूट
शुल्क
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संबंधीत भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 374 रूपये तर मागासवर्गीय आणि अनाथांसाठी 274 रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2020 असणार आहे.
परिक्षा
- पूर्व परीक्षा– 3 मे 2020
- मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1- 6 सप्टेंबर 2020
- पोलीस उपनिरीक्षक पेपर क्र.2- 13 सप्टेंबर 2020
- राज्य कर निरीक्षक पेपर क्र.2- 27 सप्टेंबर 2020
- सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर क्र.2- 2 ऑक्टोबर 2020
अधिक माहितीसाठी- पाहा