चीनच्या वुहान प्रांतांतून उगम पावलेल्या कोरोना व्हायरची दहशद सध्या संपूर्ण जगभरात पसरली आहे. व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी सरकारकडून काही निर्देश जारी केले असून नागरिक स्वत:ची व आपल्या प्रिय जनांची काळजी घेताना दिसत आहेत. हात मिळवून अभिवाद करण्याऐवजी नागरिक कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी वेगळी पद्धत आजमावत आहेत, यासंबंधी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल ही होत आहेत.
Have heard of Handshake but what LegShake greetings 😀😀!!! #CoronaVirus Outbreak… pic.twitter.com/KPRQzbDLrE
— Ke_Stanley (@IngeniousOne1) March 1, 2020
दरम्यान, व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत लोक भेटल्यानंतर शेक हॅण्ड करण्याऐवजी लेग शेक करत असल्याचे दिसत आहे. मास्क लावलेला एक व्यक्ती गाडीतून उतरतो आणि आपल्या मित्रांना भेटतो. हस्तांदोलन करून कोरोना संसर्गाच्या काळजीने तो लेग शेक करत आहेत.
Shank…If I see you no give me handshake na leg shake I want now or else I go throw you punch 🤛🏻 pic.twitter.com/ouePqrFD1C
— savageloaded (@kachyano1) February 28, 2020
नायजेरियातील लागोस स्टेटचे गर्व्हनर सॅन्वो ओलू यांनी ही हस्तांदोलन ऐवजी लेग शेकचा पर्याय आत्मसात केला असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत कोरोना 60 देशांमध्ये शिरकाव केला असून तीन हजाराहून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. तसेच कोरोना हा जगासाठी धोकदायक व्हायरस असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
“No handshake” – Lagost state gov. Sanwo-Olu performs ‘leg shake’ with Hamzat at Infectous Disease Hospital pic.twitter.com/DWlbOepRIu
— POSTNAIJA (@POSTNAIJA) March 1, 2020