Ads
बातम्या

‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता’; मनसेच्या अमेय खोपकरांची आक्रमक भूमिका…

Amey-Khopkar
डेस्क desk team

सोनी सब टिव्हीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नुकताच प्रसारित झालेल्या एका भागात जेठालालचे वडील बापुजींच्या मुखातून ‘मुंबईची भाषा हिंदी’ असल्याचा संवाद दाखविण्यात आला आहे. त्या संवादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेत सब टीव्हीने यासंबंधी माफी मागण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी मालिकेतील बापुजींच्या संवादा बद्दल आपल्या ट्विटरच्या माध्यमातून पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असे म्हंटले आहे. तसेच मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचे खोपकरांनी म्हटले आहे.

नेमके प्रसारित झालेल्या भागात काय?

दरम्यान, प्रसारित झालेल्या या भागात प्रत्येक व्यक्ती आपल्या मातृभाषेतच बोलणार असे ठरवितो. तेव्हा तयार झालेल्या विसंवादात बापुजी हे पात्र मध्यस्थी करतात आणि सर्वांचे मनोमिलन घडवून आणतात. त्याच वेळी बापुजींच्या मुखातून मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. यामुळेच मनसेने ट्विटवर आपली भूमिका मांडली असून आता यावर सब टीव्ही काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: