बहुचर्चीत आणि अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा अंधेरी येथे जल्लोषात साजरा झाला. ‘सूर्यवंशी’ ला लाभलेली जबरदस्त स्टार या सोहळ्याला उपस्थित होती. यात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार, अजय देवगण, कतरिना कैफ तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीने ही हजेरी लावली होती. मात्र, या स्टारकास्ट मधील अजून एक लोकप्रियक अभिनेता सोहळ्यास तब्बल चाळीस मिनिटे उशीरांने पोहचून जेष्ठ अभिनेत्यांना वाट पाहायला लावली. हा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह.
अभिनेता रणवीर सिंहने सोहळ्यास उशीराने हजेरी लावल्याने जमलेल्या पत्रकारांनी त्याला धारेवर धरले. मात्र, त्यांच्या प्रश्नातून पळ काढण्यासाठी त्याने ‘माझी बायको Town राहते’ असे उत्तर दिले. पण अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगणने सोहळ्या दरम्यानच रणवीरची चांगलीच शाळा घेतली. या दरम्यानची एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत अक्षय आणि अजयने रणवीरची शाळा घेत उठाबश्या काढण्यासही सांगितल्याचे दिसत आहे. ही व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर पाहताच रणवीरची बायको दीपिका पादुकोणने ही नवऱ्याची शाळा घेतली. रणवीरने पत्रकारांना दिलेल्या उत्तरावर दीपिकाने प्रतित्तर दिले आहे. दीपिका म्हणाली, ‘मी टाऊनला राहत असली तरी सगळीकडे वेळेत पोहचते’.
‘सूर्यवंशी’ चित्रपटात अक्षय, अजय, रणवीर सिंग शिवाय गुलशन ग्रोवर, अभिमन्यु दासानी, जॅकी श्रॉफ आणि सिकंदर खेर हे कलाकारही दिसणार आहेत. तसेच हा चित्रपट येत्या 24 मार्चला सर्व चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे.