Ads
बातम्या

‘Realme’ करतेय दोन नवे स्मार्टफोन लाँच

realme 6
डेस्क desk team

कमी काळात स्मार्टफोन जगतात लोकप्रिय ठरलेली Realme कंपनी लवकरच आपले नवे स्मार्टफोन लाँच करणार आहे. या संबंधीत कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी कंपनीच्या अधिकृत वेवसाईटवरून नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंग बद्दल माहिती दिली आहे. तसेच त्या ट्विटमध्ये अभिनेता सलमान खानचा फोटोही शेअर केला आहे.

Realme कंपनीने केलेल्या ट्विटमध्ये लाँच होणारे स्मार्टफोन Realme च्या 6 व्या सीरिजचा हिस्सा असलेले Realme 6 आणि Realme 6 pro हे स्मार्टफोन असणार आहेत. तसेच या स्मार्टफोन लाँचिंगची खास बाब म्हणजे यासाठी अभिनेता सलमान खान याची ब्रॅन्डअॅम्बेसेटर म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच हे स्मार्टफोन येत्या 5 मार्चला लाँच होणार असल्याची माहितीही ट्विट मधून देण्यात आली आहे.

येत्या 5 मार्चला दुपारी 12.30 वाजता हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. दरम्यान, या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल एआय क्वाड कॅमेरा आणि प्रो डिस्प्ले सारखे फिचर्स देण्यात येणार आहेत. तर Realme Pro मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल एचडी+डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच 30w फ्लॅश चार्ज फिचर्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सुद्धा असणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: