Ads
बातम्या

शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

farmerloansecondlist
डेस्क desk team

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता दुसरी यादी आज जाहीर केली आहे. या यादीत २ लाख ५२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.

वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत.

पहिली यादी
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली होती. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: