आता घरच्या घरी केक करणे अतिशय सोपे झाले आहे. फक्त आपल्याला आवड हवी! अशा आवडीने काही करणाऱ्यांसाठीच ही केकची एक रेसिपी…
साहित्य
एक वाटी रवा, एक वाटी बेसन, एक वाटी तेल, एक वाटी मिल्क पावडर, दोन वाट्या दूध, एक वाटी पिठी साखर, एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, तीन चमचे टुटी फ्रूटी, काजू, एक चमचा ईसेन्स.
कृती
- प्रथम तेल, मिल्क पावडर, पिठी साखर आणि दूध एकत्र करून थोडा वेळ फेटून घ्यावं.
- त्यात रवा व बेसन, तसेच पुन्हा अर्धी वाटी दूध घालून पुन्हा 15 मिनिटे फेटून घ्यावं.
- हे मिश्रण 15 मिनिटे तसेच ठेवावे. नंतर त्यात अजून अर्धी वाटी दूध घालून केकचे मिश्रण करा.
- शेवटी त्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, टुटी फ्रूटी, ईसेन्स घालावे.
- कुकरमध्ये जाळीचा स्टँड ठेऊन त्यावर हे मिश्रण एका भांड्याला थोडं तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावं.
- सजावटीसाठी टुटी फ्रूटी केकच्या मिश्रणावर पसरावी. मंद आचेवर हा केक ठेवावा.
- कुकरमध्ये पाणी ठेवू नये, तसेच शिटीही लावू नये. फक्त रिंग ठेवावी. अर्धा तासानंतर केक काढावा.
- व सजावट करून सर्व्ह करावा. हा केक दिसायला आणि खायलाही मस्त असतो!
01