कॉफी पिणारे व कॉफी यांचे नाते नेहमीच प्रियकर – प्रेयसीच्या नात्याइतकेच जवळचे असते. कॉफी आपणास खरोखरच इतकी आवडत असेल, तर कॉफी अंगावर किंवा कपड्यांवर सांडणेदेखील नवीन नाही. हे डाग काढणे फार किचकट व अवघड काम असते. ‘या’ पद्धतीने आपण कॉफीचे कपड्यांवर पडलेले डाग घालवता येतात…!
मॅजिकल व्हिनेगर : डाग पडलेला कपडा धुवायला टाकण्यापूर्वीच तो डाग व्हिनेगरने सहजपणे काढता येतो. डाग छोटा असल्यास व्हिनेगरने ओला केलेला टॉवेल त्यावर फिरवा. त्या टॉवेलने तो डाग पुसा. डाग मोठ्या आकाराचा असल्यास कपडा तीन चमचे व्हिनेगर व एक चमचा गार पाण्यात भिजवा. त्यानंतर डाग निघून जाईल.
बेबी वाइप्स : बेबी वाइप्सनेही कॉफीचा कपड्यांवरचा डाग काढता येतो. कॉफी कपड्यावर सांडल्यावर बेबी वाइप्स त्यावर ठेवा. तसे केल्यानंतर तो कॉफीचा डाग शोषला जाऊन डाग निघून जातो.
अंड्याचा पिवळा बलक : अंडे फोडून फेटून घ्या. त्यात टॉवेल किंवा नॅपकीन बुडवून त्याने एका मिनिटापर्यंत कॉफीचा डाग अलगद पुसावा. मग गार पाण्याने डाग धुवून टाकावा.
क्लब सोडा : जोपर्यंत कॉफीचा डाग निघत नाही, तोपर्यंत क्लब सोडा त्या डागावर टाकत राहा. काही वेळातच डाग निघून जातो.