दक्षिण आफ्रिकेला भारता विरूध्द वन डे मालिके आधी मोठा धक्का बसला आहे.आफ्रिकेच्या संघाचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडा वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे.दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडाचा मांड्यांना दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत कगिसो रबाडाला ही दुखापत झाली. त्याआधीही रबाडाला इंग्लंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
डॉक्टरांनी रबाडाला किमान चार आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रबाडाला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध वन-डे मालिकेत खेळू शकणार नाहीये.
१२ मार्चपासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. धर्मशाळा येथे पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे. यानंतर १५ तारखेला भारत लखनऊमध्ये दुसरा तर १८ तारखेला कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळेल.