Ads
बातम्या

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

डेस्क desk team

रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कारणास्तव आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यानुसार कल्याण-ठाणे धीम्या आणि पनवेल-मानखुर्द दरम्यान मध्यरेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घोषित केला आहे. परिणामी तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या 20 मिनटं उशिराने धावतील.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर स. 11 ते दु. 4 पर्यंत मेगाब्लॉक असेल. यावेळी डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर धावतील.

हार्बर रेल्वेच्या पनवेल ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर स. 10.12 ते दु. 4.26 वाजता मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात सीएसएमटी/ पनवेल-बेलापूर-वाशी/ सीएसएमटी लोकल बंद राहतील. तसेच पनवेल-ठाणे-पनवेल व नेरुळ ते बेलापूर-खारकोपर दरम्यानच्या लोकल गाड्याही बंद राहतील. या मार्गांवर विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्याम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर स. 10.35 ते दु. 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परीणामी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाऊन जलद मार्गावर धावतील. दरम्यान बोरीवलीसाठी 1,2,3,4 या प्लॅटफॉर्मवरून कोणतीही लोकल रवाना होणार नाही.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: