वसई- विरार महापालिका निवडणूक 2020 प्रभाग रचना सोडत आज पार पडली. या सोडतीत महापालिका क्षेत्रातील 115 प्रभागांपैकी 58 प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी असलेल्या 5 प्रभागांपैकी 3 जागा, अनुसूचित जमाती साठी असलेल्या 5 प्रभागांपैकी 3 जागा व ओबीसीच्या 31 प्रभागातील 16 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. तर जनरलच्या 74 प्रभागांपैकी 36 प्रभाग महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची जवळपास सगळ्याच दिग्गज नगरसेवकांना आपल्यासाठी दुसर्या जागा शोधाव्या लागणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने आदेशानुसार वसई विरार महापालिकेच्या निवडणूक २०२० च्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडला. पालघर जिल्हाधिकारी तथा वसई विरार महापालिका प्रभारी आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हि आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीत ५८ प्रभाग महिलांसाठी राखीव तर ७४ प्रभाग हे जनरल साठी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे जी प्रभाग महिलांसाठी सोडतीत राखीव झाली आहेत ते प्रभाग शहरातील दिग्गज नगरसेवकांची होती. मात्र आरक्षण सोडतीत हि प्रभाग गेल्याने अनेक मातब्बर नगरसेवकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
बड्या नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीवनगरसेवक यज्ञेश्वर पाटील (वॉर्ड – २), नगरसेवक नरेंद्र पाटील (वॉर्ड – १०), नगरसेवक माया चौधरी (वॉर्ड – १८), महेश पाटील (वॉर्ड – १९), सुदेश चौधरी (वॉर्ड – २१),हार्दिक राऊत (वॉर्ड – २९), प्रशांत राऊत (वॉर्ड – ३०),पंकज ठाकूर (वॉर्ड – ३१), अब्दुल हक सुलेमान पटेल (वॉर्ड – ४१), माजी महापौर उमेश नाईक (वॉर्ड – ४८), अरुण जाधव (वॉर्ड – ५२), भरत मकवाना (वॉर्ड – ५४), धनंजय गावडे (वॉर्ड – ६३), माजी उप महापौर रुपेश जाधव (वॉर्ड – ८०), राजेंद्र कांबळी (वॉर्ड – ९३), नितीन राऊत (वॉर्ड – १००), उप महापौर प्रकाश रॉड्रीक्स (वॉर्ड – १०१), कन्हैया भोईर (वॉर्ड – १०५), रमेश घोरकना (वॉर्ड – ११५)
प्रभाग महिलांसाठी राखीव
- अनुसूचित जाती : ७५,९०,१०७
- अनुसूचित जमाती : ७,४२,७९
- ओबीसीसाठी : ८,१०,३०, ४०,४१, ४८, ५१, ६३,७०,८३,८६,१००,१०५, ११०,११३,११५
- जनरल : ०१, ०२,०३, ०६,१७,१९, २१, ३२, ३५,३६, ३८,४३,४४,४५, ४७,५२, ५४, ५७,६०,६२,६४,७१, ७३, ८०,८२,८४, ८५, ९३, ९४,९५, ९६,९७, १०१, १०४, १०६, १११
Like this:
Like Loading...