Ads
बातम्या

मध्य रेल्वेकडून आज नाईट ब्लॉक; लोकल सह ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

डेस्क desk team

मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. चार तासांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्य़ात आला असून, रात्री 12 ते 4 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात आला असून, विद्याविहार रेल्वे स्थानकामधील जुना पूल पाडण्यासाठी हा विशेष नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रात्री कामावरुन उशीरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा दरम्यान, काहीसा त्रास होणार आहे. त्यामुळे रात्रकालीन चालवल्या जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल होणार आहे.

मध्य रेल्वेचं ट्वीट

लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल

दरम्यान, या रात्रकालीन मेगा ब्लॉकच्या काळात माटुंगा- मुलूंड स्टेशन दरम्यानदेखील नाईट ब्लॉक घेऊन 5 आणि 6 क्रमांकाच्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. लोकामान्य टिळक टर्मिनल्स ते भुवनेश्वर एक्सप्रेस ही गाडी आज रात्री 12.15 ऐवजी सकाळी 4.30 वाजता सुटणार आहे. तर एलटीटी – मांडूवाडी ही गाडी 12.35 ऐवजी पहाटे 5 वाजता सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनन्स- मडगाव डबल डेकर रात्री 1.10 ऐवजी 5.10 वाजता चालवली जाणार आहे.

रविवारी ही मेगा ब्लाक

शुक्रवार असल्याने रात्री प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमी प्रमाणेच असणार आहे. त्यामुळे रात्री मध्य रेल्वेच्या लोकलने कल्याणच्या दिशेने प्रवास करणआऱ्या प्रवाशांनी मेगा ब्लॉक अपडेट बघुनच प्रवास करावा. तसेच नेहमी प्रमाणे मध्य रेल्वे कडुन तांत्रिक दुरुस्तीसाठी 11 ते 4 या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: