Ads
जॉब हंट

Maharashtra Security Force Recruitment : राज्यात 7 हजार जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Security Force Recruitment
डेस्क desk team

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने पुरूष सुरक्षा रक्षक पदासाठी सात हजार जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीनं असेल.  ही भरती संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10  मार्च 2020 असणार आहे. त्यामुळे इच्छूक आणि पात्र उमेदवाऱ्यांनी या संधीचा लाभ करून घ्यावा. सदर भरती ही 700 हजार जागांसाठीची मेगा भरती असून नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची नामी संधी आहे.

शैक्षणिक पात्रता आणि परिक्षा

या भरतीसाठी  इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान 50 टक्के गुण असणं अनिवार्य आहे. भरतीची ठिकाण मुंबई आणि नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

वयोमर्यादा आणि शुल्क

भरतीसाठी उमेदवार 18 ते 28 वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. तसेच यासाठी चे प्रवेश शुल्क हे 250 रूपये असणार आहे.

अर्ज करण्यासाठी –  इथं क्लीक करा 

असा करा अर्ज

  • MSSC चे अधिकृत संकेतस्थळ gov.in वर जा
  • ‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा
  • आता नव्या पेजवर Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा
  • क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल
  • आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा
  • अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा.
  • शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: