मोबाईल हा सध्या काळाची गरज बनला आहे. जगभरातील जवळपास 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोक मोबाईलचा वापर करतात. तर जगभरात 200 कोटीं पेंक्षा अधिक लोक व्हॉटसअप या सोशल मीडियाचा वापर करतात. व्हॉटसअप ही प्रत्येकाची अत्यंत पर्सनल गोष्ट असून, त्यातील डाटा कोणीही वाचु नये किंवा बघु नये असे प्रत्येकाला वाटत. त्यासाठी लोक आपल्या मोबाईल लॉक बरोबरच व्हॉटसअप अॅपला देखील सेक्युरीटी कोड लावतात. मात्र जर तुमचा फोन चोरी झाला तर. आजकाल सगळ्यांच्याच मोबाईल मध्ये महत्वाचा डेडा असतो. आपल्या ईमेल आयडी पासून, ते बॅंक डिटेल, महत्वाची माहिती, पासवर्ड, बॅंकींग अॅप तेव्हा मोबाईल हरवल्यावर हा सगळा डाटा रिकवर किंवा सिक्युर कसा करता येईल वाचा.
सगळ्यात आधी सिम बंद करा
आज काल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फोन पे, गुगल पे, बॅंकेचे अॅप असतात. तुमचा मोबाईल हरवल्यावर चोरी करणारा माणूस तुमचा मोबाईल स्क्रिन लॉक सहज तोडु शकतो. यानंतर तुमच्या ईमेल आणि सिमचा वापर करुन फॉरगॉट पासवर्ड ऑपशननी तुमच्या फोन पे, गुगले पे तसेच बॅंकींग अॅपचा पासवर्ड बदलु शकतो. तसेच तुमच्या ईमेलचाही तो गैर वापर करतो. कारण आपल्या मोबाईल मधील प्लेस्टोर वापरण्यसाठी आपल्या मोबाईल मध्ये ईमेल आयडी लॉगीनच असतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 90 टक्के लोकांच्या मेल आयडीला लॉक नसतो. तेंव्हा सगळ्यात आधी 121 या नंबर वर कॉल करुन तुमचे सिमकार्ड बंद करा. 9890098900 या टोल फ्री नंबरवर कॉल करुन तुम्ही कोणत्याही कंपनीच्या कस्टमर केअर सर्व्हीस विभागाशी बोलुन तुमचे सिमकार्ड लॉक करु शकता.
ईमेल आयडी पासवर्ड बदला
यानंतर एखाद्या सायबर कॅफे किंवा क्यंप्युटर मधुन तुमच्या ईमेल अकाऊंटचा नवीन पासवर्ड जनरेट करा. तसेच सगळ्यात आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा. एकदा हरवलेला मोबाईल परत मिळत नाही, अशी अनेकांची धारणा असते. त्यामुळे अनेक जण तक्रार करणे टाळतात. या दरम्यान, तुमच्या मोबाईल मधील महितीचा कोणी गैरवापर केला तर तुम्हाला त्याचा मनस्ताप सहन करावा लागेल. पण जर तुम्ही पोलिसात तक्रार दिली असेल तर तुमची त्यातून निदान सुटका होईल.
नेट बॅंकींग बंद करा
गुगलवर तुम्हाला बॅंकेचा टोल फ्री नंबर मिळेल किंवा तुमचे खाते असलेल्या बॅंकेचा नंबर देखील तिथे तुम्हाला मिळेल. तेंव्हा तुमच्या बॅंकेत प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करुन तुमचे ऑनलाईन बॅंकींग बंद करा.
रिकवरी ऑपशन निवडा
दुसऱ्या मोबाईल मध्ये व्हॉटसअॅप नव्या सिमने वॉटसप अॅक्टिव्हेट करा. नवे सिम अॅक्टिव्हेट झाल्यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप अकाऊंट लॉगइन करा. व्हॉट्सअॅप एकावेळी एकाच फोनवर काम करतो. त्यामुळे चोरी झालेल्या फोनवरुन व्हॉटसअॅप आपोआप लॉगआऊट होईल.
व्हॉटसअपला मेल करा
व्हॉट्सअॅप अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला ईमेल करा. यासाठी तुम्हाला कंट्री कोड (+91) तुमचा मोबाईल नंबर आणि ‘Lost/Stolen: Please deacticate my account’ असा मेसेज टाईम करुन सेंड करायचा आहे. यामुळे तुमचे व्हॉटसअॅप अकाऊंट डिलिट न होता काही वेळासाठी डिअॅक्टीव्हेट होईल.