हिंदी चित्रपट सृष्टीत मर्डर चित्रपटातून इम्रान हाश्मी सोबत इंटीमेट सिन देताना दिसलेली अभिनेत्री मल्लिका शेरावतने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले होते. नेहमीच आपल्या हॉटनेसमुळे चर्चेत असेल्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकतेच काही टॉपलेस हॉट फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. मल्लिकाने ब्लॅक अॅड अंदाजात हा फोटो शेअर केला असून, चाहत्यांनी तिच्या या फोटोवर अनेक लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. चित्रपट सृष्टीपासून लांब असली तरी मात्र ती सोशल मीडियावरुन नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मल्लिकाने तिच्या या ब्लॅक अॅड व्हाईट फोटोला #मूड #ब्लॅक अॅड व्हाईट #फोटो असे कॅप्शन दिले आहे. हा तिचा पहिलाच हॉट फोटो नसुन या आधी देखील तिने अनेक हॉट फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. 2015 साली आलेल्या डर्टी पॉलिटिक्स या चित्रपटात अभिनेते ओम पुरी यांच्या सोबत काही बोल्ड सिन दिले होते. हे सिन इतके हॉट होते की त्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या.
बोल्ड इन बॉलिवुड
अभिनेत्री तनुश्री दत्ताने मीटु मोहिम सुरु केली. मात्र त्या आधी एकदा बोलताना मी फिल्मी जगता पासून सध्या दुर आहे कारण मी को आर्टीस्ट बरोबर डेटवर नाही गेली. असा खुलासा मल्लिका शेरावत ने केला होता. या इंडस्ट्रीत अनेक डायरेक्टर, हीरोंना अभिनेत्रीसोबत बेड शेअर करायचा असतो. मी त्याला नकार दिला म्हणूनच माझी बऱ्याच चित्रपटात काम करण्याची संधी हुकल्याच तिने म्हंटल होत. 2004 साली आलेल्या मर्डर चित्रपटाने चर्चत आलेल्या मल्लिका शेरावतने बिग बी अमिताब बच्चन यांच्या सोबत एका जाहिरातीतून बॉलिवुड पदार्पण केले.
मल्लिका शेरावतने वयाची चाळीशी पार केली आहे. ती 43 वर्षांची असून, अजुनही 25 वर्षांच्या मुलींना लाजवेल इतकी फिट दिसते. मध्यंतरी तीने जिममध्ये वर्काउट करतानाचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.