भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Narendra Mehta | अश्लिल चित्रफितीमुळे नरेद्र मेहतांचा राजीनामा )
प्रकरण काय?
मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेनं नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तसेच याप्रकरणी कोकण महानिरीक्षकांकडं तक्रार नोंदवली होती.
त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री 3 वाजून 35 मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नगरसेविकेचे गंभीर आरोप : माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला नरेंद्र मेहता यांच्यापासून धोका असून मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केले आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडं तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे पोलिसांकडे धाव घेतल्याचे संबंधित नगरसेविकेने म्हटले आहे.दरम्यान, या प्रकारामुळे भाजपची मोठी कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे.