टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बागी3’ नवीन गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात दिशा पाटनी भन्नाट डान्स केला आहे. ‘डू यू लव मी’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘बागी3’ चित्रपटाच ‘दस बहाने 2.0’ आणि भंकस यासारख्या गाण्यानंतर ‘डू यू लव मी’ हे एक नव गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यामध्ये दिशा पाटनी तिच्या हॉट अंदाजात पाहायला मिळते आहे. दिशानं या गाण्यात आपल्या बोल्ड लूकने प्रेक्षकांना घायाळ केल आहे. या आधी कधी अशा प्रकारे नृत्यशैली आजमावली नसल्याचं दिशानं सांगितलं आहे.
‘डू यू लव मी’ या गाण्यात दिशासोबत टाइगर श्रॉफ देखिल पाहला मिळतो आहे. मात्र या संपूर्ण गाण्यात दिशा पाटनीवर फोकस करण्यात आला आहे. त्यामुळे दिशा पाटनीचा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
‘बागी3’ मध्ये टाइगर सोबतचं श्रध्दा कपूर आणि रितेश देशमुख या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपट प्रेक्षकांसाठी डब्बल धम्माका असणार आहे. ‘बागी3’ हा चित्रपट येत्या 6 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.