संपुर्ण देशभरात आजचा 28 फेब्रुवारी हा दिवस जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या या शोधाला 1930 चे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यामुळे सरकारची या दिवसाला मान्यता मिळाल्यावर 1987 पासून देशभरात विज्ञान दिवस साजरा करण्यास सुरवात झाली. सुरवातीला काही ठराविक संस्थांमध्ये हा दिवस साजरा केला जात होता. मात्र आता व्यापक स्वरुपात खेड्यांपासून ते शहरातील प्रत्येक शाळांमध्ये या दिवशी विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रम राबवे जाते.
या दिवसा बद्दल काहींचा नाराजीचा सुरु
ज्यांच्या पर्यंत आणि ज्यांच्या मार्फत हा दिवस सर्वांपर्यंत पोहोचावा ते उद्याचे वैज्ञानिक होऊ घातलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि सर्वसामांन्यांनी विज्ञान दिनाच्या तारखे बदद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दहावी- बारावीच्या परीक्षांचा काळ असल्यामुळे शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन विज्ञान दिनाच्या उपक्रमांना उपस्थित राहता येत नाही. तसेच उन्हाचा दाह देखील वाढू लागल्यामुळे लहानग्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हाच दिवस केंद्रीय अर्थसंकल्पाचाही असल्यामुळे माध्यमे, तसेच प्रशासन या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकत नाही. अधिकाधिक नागरिकांपर्यंत विज्ञान पोहचवायचे असल्यास एखाद्या ‘निमित्ता’पेक्षा सर्वांची सोय पाहणे अधिक गरजेचे आहे. असे म्हणत अनेकांनी आजच्या तारखे बद्दल वेळावेळी विविध स्तरातून नाराजी व्यक्त केली आहे.
यंदाचा विज्ञान दिवस खास
भारत हा विकसनशील देश असून, यंदाचा विज्ञान दिवस देशासाठी खास आहे. कारण मागील वर्षी जुलै महिन्यात श्रीहरि कोटा येथुन चांद्रयान मोहिमेचे भारताने यशस्वी प्रक्षेपण करत संपुर्ण देशाचे लक्ष वेधुन घेतले होते. चांद्रयान-2 मोहिम जरी यशस्वी झाली नसली आणि विक्रम लॅंडरचा भारतीय संशोधकांचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला असला तरी, जागतिक वैज्ञानिकांच्या शोधात भारताने बजावलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. अमेरिका, चीन, रशिया नंतर भारत हा त्यासाठी चौथा देश ठरला आहे.
यावर्षीची थिम
दरवर्षी विज्ञान दिनाच्या दिवसा निमित्त काहीना काही थिम राबवली जाते. यंदा ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. जागतिक विज्ञान दिनाचा मुळ उद्देशच तो आहे, आपल्या रोजच्या जगण्यात वैज्ञानिक शोधांचे आणि नवनवीन गोष्टीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे.
अंधश्रद्धेवर मात
आपला देश हा भावना प्रधान असून, अनेक रुढी आणि परंपरांवर वैज्ञानिक शिक्षण आणि सिद्धांतामुळे मात करणे आपल्याला शक्य झाले आहे. प्रकृतीत घडत असलेल्या काही चमत्कारीक गोष्टींच्या मागे काहीना काही विज्ञान असेत है वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केले.