भारतीय प्रेक्षकच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटरसिक IPL ची वाट पाहत असतानाच आता सर्वच संघ खेळाडू निवडी व सरावावर लक्ष देऊ लागला आहे. याच दरम्यान हैदराबाद संघाने आपला कर्णधार जाहीर केली आहे.
सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली. त्याचसोबत त्यांनी वॉर्नरचा एक खास संदेशही ट्विट केला आहे.
काय म्हणाला वॉर्नर
“हैदराबाद संघाच्या सगळ्या चाहत्यांना माझा नमस्कार. माझी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. केन विल्यमसन आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाचे चांगले नेतृत्व केले. IPL जिंकण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू”, असा संदेश त्याने व्हिडीओद्वारे दिला.
🚨Announcement🚨#OrangeArmy, our captain for #IPL2020 is @davidwarner31. pic.twitter.com/lV9XAMw6RS
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 27, 2020
हैदराबादचा संघ
डेव्हिड वॉर्नर- कर्णधार, केन विलियम्सन, मनीष पांडे, विराट सिंग, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, बसील थम्पी, मिचेल मार्श, फॅबीयन, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, संजय यादव, संदीप बवानका, जॉनी बेअरस्टो, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धीमान साहा.