‘सविता भाभी तू इथंच थांब’ या पोस्टरमुळे वादाच्या भोव-यात अडकलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या मराठी चित्रपटातील ‘सविता भाभी’ गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात सविता भाभी दाखवलेल्या मराठी सिनेसृष्टीतील हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या मादक अदा पाहायला मिळत आहे. आलोक राजवाडे याने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सई सोबतच यामध्ये पर्ण पेठे अभय महाजन, अमेय वाघ यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच खूप चर्चेत आला आहे. तसं या चित्रपटाच्या नावावरुनच तो बराच चर्चेत आला आहे.
हे गाणे साकेत कानेटकर यांनी लिहिले असून तोच या गाण्याचा संगीतकार आहे. या गाण्यात सईसोबत अभिनेत्री पर्ण पेठे चाही हटके लूक दिसत आहे.
ट्रेलर मध्ये पाहायला मिळत असल्याप्रमाणे, एक मुलाच्या सेक्सशुअल फॅंटसीज पूर्ण होत नसताना तो सविता भाभी या पात्राकडे कसं पाहतो, आणि त्यातूनच तिला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ आणि ती खरोखरच भेटल्यावर त्याची प्रतिक्रिया हे सगळं या सिनेमात पाहायला मिळेल असा अंदाज आहे. हा चित्रपट येत्या 6 मार्चला प्रदर्शित होणार आहे.