Ads
बातम्या

Realmeच्या ‘या’ 3 फोनवर मिळतोय डिस्काउंट

डेस्क desk team

रियलमीच्या संध्या बाजारात धुमाकुल घातलेल्या तीन स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे तुम्हाला अगदी कमी किमतीत रियलमीचे स्मार्टफोन्स खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे आताच खरेदीची घाई करा.

Realme 5 Pro, Realme X आणि Realme XT या स्मार्टफोन्सवर २००० रुपयांचा डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. हा सेल रियलमीची अधिकृत वेबसाइटसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आला आहे. कंपनीचे इंडिया सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

Realme X

४ जीबी रॅम प्लस १४८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनवर २ हजारांचा डिस्काउंट.
आधी या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये होती, डिस्काउंटनंतर आता हा फोन १४ हजार ९९९ रुपयापर्यंत मिळणार.
८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन २ हजार डिस्काउंटनंतर १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार.

Realme XT

४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजचा फोन १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोन १५ हजार ९९९ रुपये
८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा एमपी क्वॉड कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
या सर्व फोनवर एक हजाराचा डिस्काउंट.

Realme 5 Pro

रियलमीच्या तीन प्रकारातील फोनवर 4GB+64GB, 6GB+64GB आणि 8GB+128GB
या फोनवर १ हजारांचा डिस्काउंट दिला जात आहे.
डिस्काउंटनंतर हा फोन ११ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.
याआधी या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये होती.

 

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: